Tuesday, May 4, 2021

भारतातील विषारी सापाची माहिती (प्रा.सर्जेराव येडेकर एम एस्सी प्राणिशास्त्र सेट पेट)

विषारी साप

 

    नाग Common cobra (Naja Naja Linnaeus-1758)

नाग हा भारताच्या उत्तरपूर्व आणि हिमालयात सोडून भारतात सव ठिकाणी सापडतो.
नागाला  भारतीय कायद्याच संरक्षण आहे (Schedule-II Part-II of WLPA-1972)

 

नाग हा विषारी  साप आहे. नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्या लायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखिल विविध खुणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो. तर काहिंना शून्यचा आकडा (monocol) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहित. नाग हे बरेच लांब साप आहेत. त्यांची सरासरी लांबी १.२ ते २.५ मी असते.
नागाचे मुख्य खाद्य हे उंदीरबेडूकसरडे इतर छोटे प्राणी व पक्षी आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडश्या पाडून शेतकऱ्याची मदत करत असतात. नागाचा मुख्य शत्रु माणूस आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रुंमध्ये मुंगुसगरुडकोल्हेखोकडअस्वले तसेच मोर इत्यादी आहेत. नाग शिकार करतान आपल्या विषाचा प्रामुख्याने उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बगतो व भक्ष्य पूर्ण मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पुर्णपणे गिळतो.नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो (आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे )व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत रक्षण करतो.



     नागाची जास्तीती जास्त लांबी २.२ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. नाग हा धामण आणि खाई इतर बिन विषारी सापन्सारखा दिसत असल्याने त्यांना बघून नाग पहिल्याच गैरसमज होतो.
     नाग (Cobra) याच विष हे अत्यंत घटक असल्यानेतो भारतातील ४ कुप्रसिद्ध सापांपैकी एक आहे. ज्यांना पहिल्या पहिल्या मारून टाकण्याचा प्रयत्न होतो. नागाला कित्येकदा घराभोवती शेतामध्ये पहिले जातेउंदीर आणि इतर कुर्तडनाऱ्या  प्राण्यान्मागे  तो येतोअचानक अडवले असता अगोदर तो फना काढून धमकी देतो परंतुत्यावर पाय ठेवल्यास किव्वा इजा केल्यास तो डसतो.
      नागाच्या विषावर इस्पिताल्न्मध्ये औषधे उपलब्ध आहेत. अनेक वेळा ग्रामीण भागा मध्ये उपचाराऐवजी  घराची घरीच आयुर्वेदिक पद्धती अवलम्बल्या मुळे मृत्यू होतो.

 नागराज King Cobra (Ophiophagus Hannah)

नागराज हा भारतातील पुर्व  दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहेविषारी सापांमध्ये लांबीला सर्वाधिक  विषाच्या प्रभावात नागापेक्षा कमी परंतू मात्रा मोठी असल्याने फार धोकादायकयाचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतोयाचा फणा नागांपेक्षा छोटा असतो डिवचला गेला असता  ते  फूट उंच फणा उभारतोघनदाट जंगले हा साप पसंत करतो  कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतोअभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहेसापांमध्ये अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो ( काही काळापुरतेचअंडी टाकण्यासाठी हा साप घरटे करतोमार्च-एप्रिल दरम्यान मादी वाळलेला पाला-पाचोळा शेपटीच्या साह्याने गोळा करून त्यात १५ ते ३० अंडी घालतेअंड्यातून नुकतीच बाहेर आलेली पिल्ले जवळपास  ते  फूट लांबीची तर पुर्ण वाढलेला नागराज सरासरी १० ते १५ फूट लांबीचा असतोहा साप इतर सापांना खातो याचा रंग गडद हिरवट,राखाडी,पिवळट तपकिरी असून शरीरावर पिवळसर पांढरे आडवे पट्टे असतात.

 

 

किंग कोब्रा किंवा नागराज हा जगातील आकाराने सर्वात मोठा विषारी सर्प आहेयाचे शास्त्रीय नाव ऑफिओफॅगस हॅना (ग्रीक ऑफिऑससाप ; फॅगीखाणेअसे आहे. (नागराज इलेपिडी कुलात असून या कुलातील इतर साप म्हणजे नागअॅाडलर आणि आफ्रिकेमधील ब्लॅक मांबा.) नागराज फक्त साप खाऊन राहतोत्याची लांबी सु. मीटर असतेभारतातील जंगलातून त्याचे प्रामुख्याने वास्तव्य आहेमहाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागामध्ये बंडीपूरकोइमतूरनिलगिरी केरळ राज्यामध्ये आणि आसाममधील अरण्यात नागराजाचे आस्तित्व आहेदक्षिण आशिया मधील फिलिपाइन्स आणि इंडोनेशियामध्ये तो आढळतो.पूर्व चीनमध्ये तो तुरळकपणे आढळतोत्याच्या नावात नाग’ हे विशेषण असले तरी खर्या नागप्रजातिमध्ये त्याची गणना होत नाहीत्याचे प्रजातिनाम वेगळे आहेनागराज हा हल्लेखोर आणि चपळ साप आहेएका चाव्यात मोठ्या प्रमाणात जहाल विष तो भक्ष्याच्या शरीरात सोडतो.

नाग राजाच्या त्वचेचा रंग ऑलिव्ह फळाप्रमाणे हिरवाकाळसर तपकिरी किंवा काळा असतोशरीरावर फिकट पिवळ्या रंगाचे आडवे पट्टे असतातपोट फिकट पिवळे पांढरे खवले मऊ एकसारखे असतातलहान नागराजाच्या काळ्या शरीरावर असलेल्या पिवळ्या पट्ट्यामुळे तो पटेरी मण्यार असावा असे वाटतेत्याला ओळखण्याची खरी खूण त्याचा फणापूर्ण वाढ झालेल्या नागराजाचे डोके मोठे वजनदार भासतेइतर सापाप्रमाणे नागराजाचे दोन्ही जबडे परस्पराना जोडलेले नसल्याने मोठे भक्ष्य सहजपणे त्याना गिळता येतेवरील जबड्याच्या पुढील भागामध्ये दोन अचल पोकळ विषदंत असतातयामधून विष अंतक्षेपण भक्ष्याच्या शरीरात करता येतेनर मादीहून आकाराने मोठा आणि मादीहून जाडीला अधिक असतोनागराजाचे सर्वसाधारण आयुष्य वीस वर्षांचे असते.

ऑफिओफॅगस प्रजातिमधील नागराज हा एकमेव साप आहेइतर नाग नाजा” प्रजातिमधील आहेतइतर नागापासून फण्यावरील खूण आणि फण्याच्या आकारावरून नागराज सहज ओळखता येतोत्याच्या मानेवरील “^” आकाराची खूण इतर नागाच्या फण्यावर नसतेनागराज ओळखण्याची खूण म्हणजे सहज दिसणारे डोक्यावरील दोन पश्चकपाल (ऑक्सिपिटलखवलेडोक्याच्या वरील मागील बाजूस हे खवले असतात.

इतर सापाप्रमाणे नागराजाची जीभ दुभंगलेली असतेसाप नेहमी जीभ बाहेर काढतोजिभेच्या टोकावर आलेल्या गंध कणांचे ज्ञान सापाला टाळूवर असलेल्या जॅकोबसन अवयवामुळे होतेभक्ष्याचे नेमके स्थान आणि मीलनाकाळात मादीचा मीलन गंध ओळखण्यासाठी याचा उपयोग होतोदुभंगलेल्या जिभेच्या सहाय्याने गंधकणांचे त्रिमिति ज्ञान होण्यास मदत होतेनागराजाचे डोळे तीक्ष्ण असतातहालचाल करणारी वस्तू शंभर मीटर वरून त्याला ओळखता येतेमोठ्या आकारामुळे जमिनीमधील कंपनांचे उत्तम ज्ञान त्यास होतेया कंपनावरून आणि गंधज्ञानावरून त्याला भक्ष्याचा अचूक पाठलाग करता येतोएकदा भक्ष्य जबड्यामध्ये पकडले म्हणजे अर्धवट धडपड करणारे भक्ष्य तो जबड्याने गिळण्यास प्रारंभ करतोत्याने विषदंतामधून सोडलेल्या विषामुळे भक्ष्याचे पचन होत असताना नागराज भक्ष्य गिळतोदिवसभरात कोणत्याही वेळी नागराज भक्ष्य पकडतोत्यामुळे सर्पतज्ञांच्या म्हणण्यानुसार नागराज दिनसंचारी आहे.

मानवी संपर्क नागराज सहसा टाळतोपण डिवचल्यावर तो सहज हल्ला करतोशरीराचा पुढील भाग वर उचलून मान सरळ करून विषाचे दात दाखवून फुस्कारा सोडणे हा त्याचा स्वभावनागराजाचा फूत्कार इतर सापांच्या तुलनेने मोठा आहे (२५०० हर्ट्झ) . जवळ आलेल्या कोणत्याही हालचाल करणाऱ्या सजीवमुळे नागराज चिडतोनागराज दोन मीटर परिघामध्ये हल्ला करू शकतोत्यामुळे साप लांब आहे या समजुतीने जवळ गेलेल्या व्यक्तीचा अंदाज चुकतोआणि आपसूखच माणूस नागराजाच्या तडाख्यात सापडतोएका वेळा तो अनेक चावे घेतोप्रौढ नागराज दंश करताना विषाचे दात शरीरात घुसविल्यानंतर दात थोडा वेळ स्थिर ठेवतोएवढ्या वेळेत भरपूर विष भक्ष्याच्या शरीरात गेलेले असतेत्याचा स्वभाव आपणहून हल्ला करण्याचा नाहीडिवचल्यानंतर किंवा अडचणीत सापडल्यानंतर तो स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो.

सापाचा नैसर्गिक शत्रू मुंगूस पण नागराज मुंगूस अंगावर आलेच तर त्याचा यशस्वी प्रतिकार करतेनागराजाच्या मानाने मुंगूस आकाराने अगदी लहान असल्याने हे शक्य होतेया झटापटीत मुंगसाचा बहुधा जीव जातोनागराजाची प्रजाति ऑफिओफॅगस म्हणजे साप खाणारा असे असल्याने नागराजाच्या खाण्यात धामणलहान अजगरसर्व विषारी साप असतातसाप अगदीच दुर्मीळ असतील तर सरडेपक्षी आणि लहान कुरतड्णारे प्राणी तो खातोदक्षिण भारतात चहाच्या मळ्यात नागराजामुळे अनेक मृत्यू झाले आहेतएरवी नागराज मानवी वस्तीजवळ जात नाही.

नागराजाचे विष मज्जासंस्थेवर आणि हृदयावर परिणाम करतेविष मुख्यत्वे प्रथिने आणि बहुपेप्टाइड्ने बनलेले असतेचावा घेताना विषाचे दात शरीरात .२५ ते .५० सेमीघुसतातविषाचा त्वरित मज्जासंस्थेवर परिणाम होतोतीव्रवेदनाचक्कर येणेपक्षाघातशक्तिपात ही लक्षणे ताबडतोब दिसतातहृदयक्रिया बंद होणे कोमा आणि श्वसनसंस्थेचा पक्षाघात यामुळे मानवाचा मृत्यू होतोनागराजाच्या विषाची मृत्यू मात्रा . मिग्रॅम प्रतिकिलो वजन मोजण्यात आली आहेएका अभ्यासात चिनी नागराजाच्या .३४ मि ग्रॅम प्रति किलो मात्रेमुळे मृत्यू ओढवल्याचे आढळले आहेनागराज एका वेळी ३८०-६०० मि ग्रॅम विष अंतक्षेपित करत असल्याने नागराजाने दंश केलेली व्यक्ती पंधरा मिनिटात मरण पावतेसरासरी ३०-४५ मिनिटामध्ये मृत्यू ओढवतोनागराजाने दंश केलेल्या ७५व्यक्ती मरण पावतातसध्या नागराजाच्या विषावर दोन प्रतिविषे उपलब्ध आहेतथायलंड रेड क्रॉस आणि हैद्राबाद मधील सेंट्रल रीसर्च इन्सटिट्यूट या दोन्ही संस्थेने बनविलेली प्रतिविषांची उपलब्धता कमी आहे.

नागराजाची मादी हा एकमेव साप अंड्यांचे रक्षण करतोजंगलातील वाळलेली पाने आणि गवताचा उंचवटा करून त्यामध्ये मादी २०-४० अंडी घालतेअंड्यामधून पिले बाहेर पडेपर्यंत मादी या पानांच्या घरट्यावर वेटोळे घालून बसतेजवळ आलेल्या प्रत्येक प्राण्यास मादी भेसडावतेपानांच्या घरात तापमान २८ अंश सें ठेवलेले असतेअंड्यातून पिले बाहेर येण्याच्या वेळी मादी घरट्यापासून दूर जाऊन एखादे भक्ष्य खातेआपली पिले खाण्याचा नागराजाच्या मादीचा स्वभाव नाहीअंड्यातून बाहेर पडलेली पिले ४५-५५ सेमी लांबीची असतातत्यांचे विष प्रौढाइतकेच प्रभावी असतेपिले जन्मापासून थोडी चिडखोर असतात.

मण्यार  Common Krait and Banded Krait  (bungarus caeruleus)

लांबीपिलांची लांबी १०-११ इंच असतेतर प्रौढ साप  फुटा पेक्षा मोठा अस्तुजास्तीत जास्त लांबी . फुट मोजली आहे.
मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. (इतर विषारी सापनागफुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेतसाधा मण्यार अथवा मण्यारपट्टेरी मण्यार काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतातमण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत  त्यांचा अन्य आग्नेय आशियायी देशांमध्ये वावर आहे.  भारतात आढळणारा साधा मण्यार सर्वत्र आढळतो  राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतोह्याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतातहे खवले शेपटीकडे अधिक  डोक्याकडे कमी कमी होत जातातमण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असतेमण्यार मुख्यत्वे निशाचर आहेअन्नाच्या  थंडाव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात.
अन्न - मण्यारचे मुख्य खाद्य उंदीर  तत्सम कुरतडणारे प्राणीपाली  सरडेइतर छोटे साप  बेडूक इत्यादी आहे
विषमण्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात  त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर (Neural system) होतोमण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते.मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतातचावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहेमण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाहीप्रचंड तहान लागतेपोटदुखी सुरू होते  श्चास घेण्यास त्रास होऊ लागतो[. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.

घोणस Russell’s Viper (Daboia Russelli)

घोणस हा भारतातील एक मंडली सर्प (Viper) जातीचा साप आहेतो उत्तर पूर्व भारत सोडून संपूर्ण देशात आधालातो. पहिल्यांदा पाहून तो अनेकांना अजगर असल्यासारखे वाटते. घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणार्‍या तीन समांतर रेषा आणि त्याचे बेडकासारख्के तोंड. घोणस हिरवापिवळाहलका करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात
घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात.  
घोणसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहेकी घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात.
विष: घोणसाचे विष अतिशय जहाल असते. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणा‍र्‍या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्याकानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.
घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नयेअसे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणेहाच सर्वोत्तम उपाय आहे.रुग्णास धीर द्यावा. अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते. अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो. म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेच आहे.

चापडा  Bamboo Pit Viper (Trimeresurus Gramineus)

चापडा किंवा हिरवा चापडा हा भारतातील सुद्धा एक मंडली सर्प (Viper) जातीचा साप आहे,  हा विषारी जातीतील साप आहे. हा साप हिरव्या रंगाचा असून हे लहान झुडपांच्या फांद्यांवरवेलींवर राहतो. हा साप घोणस प्रमाणेच अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतो. हा साप प्रामुख्याने दक्षिण भारतात सापडतोमहाराष्ट्रातील कोकणबोरिवली राष्ट्रीय उद्यान येथे सापडतो

फुरसे Saw Scaled Viper (Echis)

एक मंडली सर्प (व्हायपर). नाक व डोळा यांच्यामध्ये खळगा नसल्यामुळे याचा सापांच्या व्हायपरिनी उपकुलात समावेश होतो म्हणजे ⇨घोणसाप्रमाणेच हा अरंध्र मंडली’ सर्प आहे. याचे शास्त्रीय नाव एकिस कॅरिनेटस असे आहे. हा विषारी साप भारतात जवळजवळ सगळीकडे आढळतो. बहुधा मैदानी प्रदेशात जरी तो राहत असलातरी १,८२९ मी. किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर तो आढळला आहे. ओसाड व रेताड प्रदेश आणि खडकाळ डोंगराळ भाग या ठिकाणी तो राहतो; दाट जंगलात मात्र तो नसतो. कडक उन्हाचा त्याला त्रास होत नसावा असे वाटते कारण तापलेली वाळू किंवा जमीन यावर तो पुष्कळदा दिसतो. महाराष्ट्रात  कोकणातविशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात हे साप फार आहेत.

फुरसे एक लहानसर (लांबी ४६-५५ सेंमी.) साप आहे; पण कधीकधी ७९ सेंमी. लांबीचे नमुनेही आढळतात. यांचा रंग तपकिरीफिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. पाठीच्या दोन्ही बाजूंवर एकेक फिकट पांढरी नागमोडी रेषा असते. कधीकधी पाठीच्या मध्यरेषेवर लहान पांढऱ्या रंगाच्या काहीशा चौकोनी ठिपक्यांची ओळ असते आणि ते बाजूच्या नागमोडी रेषेला चिकटलेले असतात. डोके तिकोनी असून त्याच्यावर बाणासारखी (­) स्पष्ट पांढरी खूण असते. याचे विषदंत काहीसे लांब असतात. पोटाचा रंग पांढरा असतो आणि त्यावर फिकट तपकिरी किंवा काळे ठिपके असतात. शेपूट लहान असते. 

डोक्यावरचे खवले बारीक असून प्रत्येकावर कणा (कंगोरा) असतो. पाठीवरच्या सगळ्या खवल्यांवर कणा असून त्याला दाते असतात. फुरसे दुष्ट असते. त्याला किंचित जरी डिवचले किंवा चिडविलेतर ते इंग्रजी आठच्या (8) आकड्याप्रमाणे आपल्या शरीराच्या गुंडाळ्या करून त्या एकमेकींवर एकसारख्या घासते. त्यामुळे दाते असलेले खरखरीत खवले एकमेकांवर घासले जाऊन खस् खस् असा आवाज एकसारखा होतो. या स्थितीत वरचेवर जीभ बाहेर काढून ते झटकन डोके पुढे काढते आणि समोर दिसेल त्या पदार्थाचा चावा घेऊन लगेच डोके मागे घेते. हा साप अतिशय चपळ असल्यामुळे तो केव्हा दंश करतो ते पुष्कळदा कळतसुद्धा नाही. त्याला थोडासा जरी धक्का लागला तरी तो चावतो.

हा साप बेडूकसरडेपालीलहान सापविंचू आणि अनेक प्रकारचे किडे खातो. साधारणपणे जुलै महिन्यात या सापाची वीण होतेमादी पिल्लांना जन्म देते.

हा साप लहान असलातरी याचे विष नागाच्या विषाच्या पाचपट आणि घोणसाच्या विषाच्या सोळापट जहाल असते. फुरसे चावलेल्या लोकांपैकी १०-२० % माणसे दगावतात. दंश झाल्यापासून २४ तासांच्या आत मृत्यू येतो किंवा रोगी २-२० दिवसदेखील जगतो. फुरसे लहान असल्यामुळे दंशाच्या वेळी थोडे विष अंगात शिरतेयामुळे बऱ्याच वेळा माणसे याच्या विषाने दगावत नाहीत.

No comments:

Post a Comment

Difference Between Anabolism And Catabolism

Differences between Catabolism and Anabolism    Mr.Sarjerao Yedekar (M.Sc BEd Zoology MH-SET,CTET,P.Hd Apperd) Comparison between  Catabolis...