Wednesday, December 15, 2021

१२ वी सायन्स नंतर पुढील करियर विषयी माहिती व मार्गदर्शन प्रा सर्जेराव येडेकर एम एस्सी बीएड सेट सिटीईटी

 

Career path finder- After 12th. Science

  12 बारावी विज्ञान शाखा

विद्यार्थी मित्रहो ,

आज आपण 12 बारावी (विज्ञान) शाखेतील पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी व काही व्यवसायिक संधी याबद्दल माहिती पाहणार आहोत. तरी संपूर्ण माहिती आपण जाणून घ्यावी आणि आपल्या भविष्यासाठी आपल्या करिअरसाठी योग्य ती दिशा ठरवून आपणास आवडणाऱ्या योग्य त्या शैक्षणिक प्रवाहात सामील व्हावे व पुढील आयुष्य आपण आपले घडवावे. ज्या प्रमाणे म्हणतात  ' तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार' त्यामुळे आपणास स्वतःचा योग्य मार्ग स्वतः निवडायचा आहे .म्हणून मी तुम्हाला विविध कोर्सेस बद्दल माहिती सांगणार आहे. खालील प्रमाणे विविध कोर्सेस आपल्या भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

12 बारावी (विज्ञान) शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक संधी. ज्या विद्यार्थ्यांनी 12 बारावी (विज्ञान ) शाखेत फिजिक्स ,केमिस्ट्री ,बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स (जनरल सायन्स) हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेत त्यांच्यासाठी खालील कोर्सेस साठी आपण काय करू शकता.

1.इयत्ता 12 बारावी( विज्ञान) शाखेतील पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बी .फार्मा .(B.Pharm.)नावाचा डिग्री कोर्स तीन वर्षाचा करता येतो .त्यानंतर एम. फार्म.(M.Pharm.) हा पदव्युत्तर कोर्स दोन वर्षाचा पूर्ण करता येतो व त्यानंतर एमबीए(MBA) हे करता येतं ज्यामुळे विद्यार्थ्यांना फार्मासिटिकल कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या चांगल्या पोस्टवर नोकरी मिळते किंवा एमपीएससी च्या माध्यमातून सरकारी नोकरी सुद्धा मिळू शकते.  काही विद्यार्थ्यांना डी. फार्मसी.(D.Pharm.) हा डिप्लोमा कोर्स करून सुद्धा आपल्याला स्वतःचा व्यवसाय मेडिकल शॉप किंवा कंपनीमध्ये नोकरी करता येते.

2. बी.एससी .(B.Sc.)डेअरी टेक्नॉलॉजी हा चार वर्षाचा पदवी कोर्स करून पुढे एम बी ए(MBA) केल्यास चांगला जॉब मिळू शकतो. बी.एससी.  (B.Sc.) एग्रीकल्चरल ही चार वर्षाची पदवी कोर्स तसेच एनिमल हसबंडरी हा पदवी कोर्स आपण पूर्ण करू शकता.

3. बी. टेक.(B.Tech.) हा चार वर्षांचा एग्रीकल्चरल टेक्नॉलॉजी, फुड टेक्नॉलॉजी, ऍग्रो इंजीनियरिंग इत्यादी कोर्स पूर्ण करता येतात .त्यानंतर एम.टेक .(M.Tech)हा त्याच विषयातील स्पेसिफिक पदव्युत्तर कोर्स करून पुढे दोन वर्षाचे एमबीए (MBA)करून मोठ्या कंपन्यांमध्ये काम करू शकता किंवा सरकारी नोकरी मध्ये सुद्धा कृषी विभागांमध्ये नोकरी प्राप्त करू शकता.

4. 12 बारावी (विज्ञान) शाखेतील विद्यार्थ्यांना डी. एड.(D.Ed.) करून शिक्षकी पेशा मध्ये सरकारी किंवा निमसरकारी नोकरी सुद्धा मिळू शकते.त्यासाठी पुढे टीईटी परीक्षा पास करावी लागते

5. बी. टेक .किंवा बी.एस्सी.(B.Tech./ B.Sc.) बायोटेक्नॉलॉजी ही चार वर्षाची पदवी विद्यार्थी घेऊ शकतात त्यानंतर एम .एससी. किंवा एम. टेक.  (M.Sc./M.Tech.)बायोटेक्नॉलॉजी या विषयात घेऊन आपण कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते.

6. 12 बारावी (विज्ञान) शाखेतील विद्यार्थी मॅथेमॅटिक्स हा विषय घेऊन विशेष प्राविण्य प्राप्त झालेले विद्यार्थी बी.ई. किंवा बी.टेक. (B.E./B.Tech. )इंजिनिअरिंगची पदवी(जेई व जेई ऍडव्हान्स देऊन आपण आयआयटी किंवा एनआयटी इन्स्टिट्यूटमध्ये) आपण सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स ,मेकॅनिकल ,कम्प्युटर सायन्स, इंस्ट्रुमेंटल, केमिकल टेक्नॉलॉजी, इत्यादी साईड घेऊन प्राप्त करू शकता व त्यानंतर एम. ई. किंवा एम.टेक.(M.E./M.Tech.) ही पदव्युत्तर पदवी आपण वरील शाखेत मिळू शकता त्यानंतर आपण एम. एस.(M.S.) करण्यासाठी परदेशात सुद्धा जाऊ शकता. गेट(GET) परीक्षा पास झाल्यानंतर आपण प्राध्यापकी क्षेत्रांमध्ये सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी करू शकता. किंवा शासकीय सेवेत सुद्धा आपल्याला सुवर्णसंधी मिळू शकते.

7. 12 बारावी (विज्ञान ) शाखेतील पास झालेल्या विद्यार्थ्यांना जनरल बी .एससी.(B.Sc.) करता येते तीन वर्षाचा पदवी कोर्स असतो. त्यात फिजिक्स ,केमिस्ट्री ,झूलॉजी, बॉटनी ,कम्प्युटर सायन्स, मॅथेमॅटिक्स ,इलेक्ट्रॉनिक्स ,मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फिशरी सायन्स, डेअरी सायन्स, हॉर्टिकल्चर, जिओलॉजी या विषयांचे दोन ते तीन विषयाचे ग्रुप करून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतो व त्यानंतर एम. एससी.(M.Sc.) वरील विषयातील एका विषयांमध्ये दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून पुढे सेट, नेट, गेट, एम .फिल . पी.एचडी. (SET/NET/GET/M.Phil./Ph.D.) पूर्ण करून वरिष्ठ प्राध्यापक म्हणून आपल्याला नोकरी मिळू शकते (विद्यापीठांमध्ये महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी महाविद्यालयात संधी मिळू शकते.)

8.12 बारावी  (विज्ञान) पास होणारे विद्यार्थी पाच वर्षाचा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर(B.Arch.) हा पदवी पदव्युत्तर कोर्स पूर्ण करू शकतात व स्वतःचा व्यवसाय निर्माण करू शकतात .सध्या या व्यवसायाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे.

9. 12 बारावी(विज्ञान) उत्तीर्ण होऊन तीन वर्षाची बी.एसी .(B.Sc.)  पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थी एमपीएससी(MPSC),यु पी एस सी(UPSC) एसएससी (SSC)बी आर बी (BRB)किंवा बीएसएफ(BSF) सी आर पी एफ (CRPF)किंवा सीआयएसएफ(CISF) मध्ये सब इंस्पेक्टर या पदासाठी तयारी करू शकता.

10.आपण बीसीए /बीसीएस हा संगणकाचा पदवी कोर्स व त्यानंतर पदव्युत्तर एम .सी .ए .,एम .सी. एम.(MCA,MCM.) दोन किंवा तीन वर्षाची सॉफ्टवेअर पदवी  शिकू शकता किंवा एमबीए (MBA)पदवी-पदव्युत्तर पऱ्यांचे शिक्षण घेऊ शकता व त्याचा फायदा आपणास आयटी किंवा अन्य कंपनीमध्ये महत्त्वाच्या पदावर नोकरी मिळू शकते. 

 आपण इयत्ता 12 बारावी (विज्ञान) शाखेमध्ये (फिजिक्स ,केमिस्ट्री ,बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स ) विषय घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्याला आपण (जनरल सायन्स) असं म्हणतो.

आज आपण 12 बारावी (विज्ञान )शाखेत (फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी) विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खालील प्रमाणे शिक्षणाच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. ह्या ग्रुप ला आपण (बायलॉजी ग्रुप )असं सुद्धा संबोधतो. जनरल सायन्स मधील बरेच कोर्सेस ला बायोलॉजी ग्रुप च्या  विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेता येतात ज्या विषयाला मॅथेमॅटिक्स ची आवश्यकता आहे असे विषय सोडून.

1. 12 बारावी (विज्ञान) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नीट, एम्स, जीपमर, आर्मी मेडिकल कॉलेज  (NEET/AIIMS/JIPMER/AFMC) सीईटी परीक्षेच्या माध्यमातून आपणास मेरिट बेसवर आपण खालील प्रमाणे कोर्सला प्रवेश घेऊ शकतो.

1.एम .बी .बी .एस .(MBBS)ॲलोपॅथी चार वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी सीईटी च्या माध्यमातून एम .एस. /एम.डी .(MS/MD)हे कोर्स करता येतात किंवा पदवी प्राप्त झाल्यानंतर डिप्लोमा कोर्स ही करता येतात व त्यातून सरकारी नोकरी मध्ये किंवा स्वतःचा  वैद्यकीय व्यवसाय करता येतो सध्या विविध प्रकारच्या तज्ञ डॉक्टरांची खूप मोठी आवश्यकता आहे.

2.बी. ए .एम .एस .(BAMS)आयुर्वेद मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर एम.डी .(MD)विशेष तज्ञ विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी करता येते. भारतीय आयुर्वेद पद्धत खूप जुनी आहे व तिचा खूप मोठा चांगला परिणाम भारतीय औषध व चिकित्सा परंपरेतून भारित भारतीयांना अवगत आहे.

3.बी .एच. एम .एस .(BHMS)होमिओपॅथी मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर एम.डी .(MD)ही होमिओपॅथिक मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण करता येते.

4.बी.डी.एस .(BDS)दंत शास्त्र यानंतर एम.डी.एस.(MDS) ही पदव्युत्तर पदवी दंत शास्त्र या विषयावर प्राप्त करता येते.

5.बी. व्ही .एससी. (B.V.Sc)व्हेटर्नरी सायन्स पदवी घेतल्यानंतर एम .व्ही .एससी (M.V.Sc.)ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करून सरकारी नोकरी किंवा मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक म्हणून काम करता येते. 

6.डी. फार्मा, बी. फार्मा.(D Pharm../B.Pharm.) फार्मासिटिकल डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स पूर्ण करून एम. फार्मा(M.Pharm.). ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करून एमबीए(MBA) केल्यास ोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ नोकर्‍या मिळू शकतात.  

7.बी.एस्सी .(B.Sc.)नर्सिंग होम सायन्स हा पदवी कोर्स करून आपण सरकारी नोकरी किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारचे नोकरी प्राप्त करू शकतो.

8. बी.एससी .(B.Sc.)बायोटेक्नॉलॉजी ,मायक्रोबायोलॉजी, फिशरी सायन्स, जनरल जनरल सायन्स चे विषय मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर एम. एससी.(M.Sc.) आणि त्यानंतर सेट नेट पीएच.डी.(SET/NET/Ph.D.) करून प्राध्यापक क्षेत्रात किंवा संशोधन क्षेत्रात काम करता येते.

9. एन डी ए (NDA) नॅशनल डिफेन्स अकॅडमी ची सीईटी परीक्षा दिल्यानंतर भारतीय संरक्षण दलातला कोर्स पूर्ण केल्यानंतर कॅप्टन या पदावर आपली नेमणूक होऊ शकते.

10. 12 बारावी (विज्ञान ) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पाच वर्षाचा प्लॅनिंग अँड डिझायनिंग हा पदवी कोर्स करू शकतात किंवा तीन वर्षाचा टेक्निकल एंट्री इन इंडियन आर्मी हा कोर्स सुद्धा करता येतो.

11. 12 बारावी (विज्ञान )उत्तीर्ण विद्यार्थी तीन ते चार वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंट पदवी कोर्स सुद्धा करू शकतात व एक ते दोन वर्षाचा फिल्म अँड टेलिव्हिजन डिप्लोमा ,फिल्म एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, फिल्म प्रोसेसिंग , जॉब इन फिल्म प्रोडक्शन ,ॲनिमेशन डिप्लोमा किंवा पदवी कोर्स करू शकतात.

विद्यार्थी मित्रहो वरील बारावी विज्ञान उत्तीर्ण  विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती शैक्षणिक संधी कोणती कोणती आहे ही नमूद केलेली आहे वरील माहिती आवडल्यास कॉमेंट्स आणि शेअर करा.


1 comment:

Difference Between Anabolism And Catabolism

Differences between Catabolism and Anabolism    Mr.Sarjerao Yedekar (M.Sc BEd Zoology MH-SET,CTET,P.Hd Apperd) Comparison between  Catabolis...